जळगावमहाराष्ट्र

एरंडोलला विकासकामांचे भूमिपूजन.

प्रजासत्ताक दिनी आमदार अमोल पाटील यांची १५० कोटींची भेट
प्रतिनिधी – शहराच्या वाढत्या विस्ताराचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून १५० कोटी रुपयांच्या विकासकामांचे नियोजन करण्यात आले असून, या कामांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, असे प्रतिपादन आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आ. अमोल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या तब्बल १५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा एरंडोल शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शहराच्या मूलभूत गरजांपासून ते सौंदर्यीकरणापर्यंतच्या अनेक महत्त्वपूर्ण कामांची पायाभरणी करण्यात आली.
यामध्ये भुयारी गटार प्रकल्पाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, हनुमान मंदिर परिसर, हिंगलाज कॉलनी, न्यू लक्ष्मीनगर व गांधीपुरा परिसरातील कामांचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच नाभिक समाज मंदिर (गढीखाली), आदिवासी भिल समाज सामाजिक सभागृह (प्रभाग क्रमांक २) व चौधरी समाज मंगल कार्यालय (गांधीपुरा) या सामाजिक सभागृहांच्या कामांचे भूमिपूजन झाले. यासोबतच जुना पद्मालय परिसर सुशोभीकरण व शिवशांतीनगर भागातील रस्त्यांच्या खडीकरणाच्या कामांना गती देण्यात आली आहे.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी अमोल बागुल, उपनगराध्यक्षा सुनीता माळी, शिवसेना गटनेते प्रा. मनोज पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, युवासेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या विकासकामांमुळे एरंडोल शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, शहरवासीयांनी आमदार अमोल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button