जळगावमहाराष्ट्रराज्य

माहिती अधिकार कायदा सरकारला नकोसा झालाय का?; सजग नागरिक मंचातर्फे ५ जुलैला चर्चासत्र..

विशेष प्रतिनिधी पुणे : माहिती अधिकार कायदा २००५ अंमलात येऊन दोन दशके पूर्ण होत असताना महाराष्ट्र शासनाने नुकत्याच केलेल्या नियमावलीतील बदलांमुळे या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर “माहिती अधिकार कायदा सरकारला नकोसा झालाय का?” या विषयावर सजग नागरिक मंचातर्फे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हे चर्चासत्र रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथील IMDR कॉलेज सभागृह, बीएमसीसी रोड येथे होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे माजी प्रधान सचिव महेश झगडे (निवृत्त आयएएस), निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे आणि माहिती अधिकार विषयाचे अभ्यासक विवेक वेलणकर हे चर्चासत्रात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेले नवे नियम आवश्यक आहेत की ते कायद्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहेत, या बदलांचा नागरिकांवर आणि पारदर्शक प्रशासनावर काय परिणाम होऊ शकतो, यासह विविध मुद्द्यांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा होणार आहे.
सदर कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य व खुला असून माहिती अधिकार, पारदर्शकता आणि सुशासन यामध्ये रस असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विवेक वेलणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button