जळगावमहाराष्ट्र

विश्वकर्मा सुतार समाज ट्रस्टची नवीन कार्यकारिणी जाहीर……

एरंडोल – येथील श्री विश्वकर्मा सुतार समाज ट्रस्टला नुकतीच धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत नोंदणी क्रमांक मिळाला असून ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवाजी विश्वनाथ सुतार यांची तर उपाध्यक्षपदी दिलीप दत्तात्रय हिरे यांची निवड करण्यात आली. सचिव पदी दशरथ विनायक देवरे, खजिनदार दिलीप बाबुराव देवरे विश्वस्त रघुनाथ पांडुरंग सुतार, कैलास काळू सुतार, नानाभाऊ काशीराम मिस्त्री, दीपक प्रकाश मिस्त्री, अमोल रवींद्र सुतार, हरी पांडुरंग सुतार, मनोज जगन्नाथ मिस्त्री व सल्लागारपदी देविदास राम वाघ यांची सर्वानुमते निवड करत समाजाच्या उत्कर्षासाठी श्री विश्वकर्मा समाज ट्रस्टची स्थापना केल्याची भूमिका अध्यक्ष शिवाजी पाटील व उपाध्यक्ष दिलीप हिरे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली. नूतन कार्यकारिणीचे सुतार समाजाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व विनायक देवरे, नपा चे निवृत्त अभियंता लक्ष्मण शेलार आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button