जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

जाजू परिवारातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव….,न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

प्रतिनिधी एरंडोल : एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कै. डॉ. जगदीशचंद्र रामनाथ जाजू व कै. सौ. चित्राबाई जगदीश जाजू यांच्या स्मरणार्थ सालाबादाप्रमाणे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा जाजू परिवारातर्फे बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक हॅरी जॉन, शिक्षकवृंद, पालक तसेच  अनुपमजी जाजू,प्रियंकाजी अनुपमजी जाजू यांच्यासह जाजू परिवारातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बक्षिसांच्या माध्यमातून मिळणारा सन्मान हा विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा गौरव करण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढण्यास मदत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका मृणाल काबरा व सहाय्यक शिक्षक अभिजीत जोशी यांनी केले. आभार उपमुख्याध्यापिका सरिता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाचे सहकार्य लाभले.
समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button