रा.ति. काबरे विद्यालय, एरंडोलचा दहावीचा निकाल 81.10 टक्के

एरंडोल : रा. ति. काबरे विद्यालय येथील इयत्ता दहावीचा निकाल यंदा 81.10 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 254 विद्यार्थ्यांपैकी 206 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कु. छायेश्वरी झगडू निकम हिने 92.80 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. समृद्धी ज्ञानेश्वर पाटील हिने 91.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. पूर्वी हेमंत धामणे हिने 90 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र जी काबरे,सचिव राजूभाऊ मणियार, सहसचिव धिरजभाऊ काबरे, शाळेचे चेअरमन अनिलभाऊ बिर्ला, संस्थेचे सदस्य सतीशभाऊ परदेशी , परेश बिर्ला तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. राठी सर, उपमुख्याध्यापक पी. एच. नेटके सर, पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.





