जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचा दिवसभर एजन्सीवर मुक्काम.

प्रतिनिधी एरंडोल – युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर व अफवांमुळे काही अंशी परिणाम झाला असून त्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना तासंतास उन्हात उभे राहून गॅस एजन्सीवर मुक्काम करावा लागत असल्याचा प्रकार एरंडोल येथील पद्मालय गॅस एजन्सीवर बघायला मिळत आहे.मात्र एजन्सीचे मालक व सरकार कडून राज्यात गॅस साठा मुबलक असून कोणीही गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.
       याबाबत सविस्तर माहिती अशी की एरंडोल येथील पद्मालय गॅस एजन्सीचे एकूण १८१३२ ग्राहक आहेत.त्यांच्यापैकी १०१९३ ग्राहकांकडे सिंगल सिलेंडर तर ६५९७ ग्राहकांकडे डबल सिलेंडर आहेत.४८९२ ग्राहकांनी अजूनही ई.के.वाय.सी.केली नाही.त्यामुळे देखील अनेक अडचणी येत असल्याचे पद्मालय गॅस एजन्सीचे मालक अशोक पाटील यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून जगात युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाई झाल्याच्या अफवा पसरत आहेत.त्यामुळे अनेक ठिकाणी लोक घाबरले असून घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सीच्या बाहेर गर्दी करत आहेत.यात प्रत्यक्षात गॅस गोडाऊन वर असणाऱ्या सिलेंडर पैकी जास्त ग्राहक आल्याने सिलेंडर संपत आहेत व त्यामुळे सर्वांना सिलेंडर मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.व्यावसायिक सिलेंडर मिळणे बंद झाल्याने काही लोक व्यावसायिक ठिकाणी सुद्धा सदर सिलेंडर विकत असल्याचे बोलले जात आहेत.त्यामुळे शिल्लक साठ्यापेक्षा मागणी वाढल्याने सुद्धा गर्दी होत असल्याचे बोलले जात आहे.याठिकाणी काही वेळेस छोटेमोठे वाद देखील होत आहे.यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात व कूपन पद्धतीने सिलेंडर वाटप केले जात आहे.एजन्सीचे मालक अशोक पाटील यांनी मात्र ग्राहकांनी एजन्सीवर गर्दी करू नये.सर्वांना घरपोच सिलेंडर मिळणार असल्याचे सांगितले तसेच अजूनही अनेकांनी आपली ई.के.वाय.सी.केलेली नसून ती लवकरात लवकर करावी,मयत व्यक्तीच्या नावे सिलेंडर असतील तर लवकरात लवकर त्यांच्या वारसाने ते सिलेंडर आपल्या नावावर करावे, सिलेंडर ची डिलिव्हरी झाल्यावर लागलीच डिलिव्हरी नंबर द्यावा व आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button