जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

राम नवमी निमित्त एरंडोल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी एरंडोल : प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सव अर्थात राम नवमी निमित्त पांडव नगरी बहुउद्देशीय संस्था, एरंडोल व श्री गोळवलकर रक्तपेढी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून शिबिराचे ठिकाण पांडव वाड्या जवळ, एरंडोल येथे आहे.
रक्तदान हे जीवनदान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद देत नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार तसेच मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून राम नवमी उत्सव अधिक अर्थपूर्ण आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न पांडव नगरी बहुउद्देशीय संस्था, एरंडोल यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button