जळगावमहाराष्ट्र

२८ सप्टेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ माहिती अधिकार दिन ‘ साजरा करण्याच्या मागणीसाठी एरंडोल येथे माहिती अधिकार कार्यकर्ता शाखेतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…!

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘ माहिती अधिकार दिन ‘ साजरा करण्याबाबत सूचना देण्यात यावी.यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, एरंडोल शाखेतर्फे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना तालुकाध्यक्ष सिताराम आनंदा मराठे,संघटक विज्ञान बुधा पाटील, कार्यकारिणी सदस्य राजधर संतोष महाजन, तालुका उपाध्यक्ष तुषार सुभाष शिंपी हे उपस्थित होते.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मार्गदर्शन करणे, कार्यालयाच्या दर्शनी भागात माहिती अधिकारासंबधी आवश्यक माहिती व जनजागृतीपर फलक लावणे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button