जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

गुर्जर समाजाच्या नेतृत्वाचा शिवसेनेत प्रवेश – एरंडोलमध्ये उत्साहाचे वातावरण”

प्रतिनिधी – एरंडोल: शहरातील गुर्जर समाजाचे अध्यक्ष व नामांकित सामाजिक कार्यकर्ते मा. गोपाल शामु पाटील तसेच मा. सौ. कमलाबाई गोपाल पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.



त्यांनी एरंडोल- जळगाव विधानसभा क्षेत्राचे माजी.आमदार चिमणरावजी पाटील व कार्यसम्राट आमदार मा. अमोलदादा पाटील यांच्या विकासाभिमुख व लोकहितैषी नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेतला.

या प्रसंगी आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी दोघांचा मानाचा सत्कार करून शिवसेनेत स्वागत केले. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की,



गोपाळ पाटील यांनी अनेक वर्षांपासून समाजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांचा शिवसेनेत प्रवेश हा पक्षासाठी मोठी ताकद ठरणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट होईल.असे मत व्यक्त केले.

यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर सर्वांनी एकमताने सांगितले की, शिवसेनेच्या माध्यमातून एरंडोल तालुक्याचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button