जळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथे जळगाव जिल्ह्यातील प्रथम सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्र सुरू.

प्रतिनिधी – एरंडोल येथील श्रीकृपा जिन्नर्स प्रा. ली.येथे गुरुवार दि. ३०/१०/२०२५ भारतीय कपास निगम (सी.सी.आय. ) तर्फे कापूस खरेदी शुभारंभ धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील,उप सभापती सुदाम पाटील,सचिव नवनाथ तायडे, उपसचिव मोरेश्वर पाटील,मिलिंद दाभाडे,केंद्र प्रमुख योगेश थाळनेरकर, सायन जना, दीपंकर रॉय,श्रीकृपा जिनर्सचे संचालक संजय काबरे यांच्या उपस्थित करण्यात आला.
याप्रसंगी शेतकरी रमेश शांताराम महाजन यांना प्रथम कापूस विक्रीचा मान मिळाला तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील यांनी काटा पूजन केले व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कापूस सी.सी.आय.केंद्रावरच आणावा व ॲप द्वारे नोंदणी करून आपला कापूस सी.सी.आय.एरंडोल केंद्रात विक्रीसाठी आणावा असे आवाहन केले आहे.यावेळी ८ हजार६० रु.दराने कापूस खरेदी करण्यात आली व दिवसभरात एकूण १५ क्विंटल ५० किलो कापूस खरेदी करण्यात आला.
कर्मचारी गोविंद मालपूरे,विनोद साळी, प्रसाद महाजन, ग्रेडर ईश्वर शर्मा, अतुल झवर,प्रकाश ढगे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button