जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

प्रचार कालावधी एक दिवसांनी वाढविलाउमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर

एरंडोल – महाराष्ट्र शासनाच्या राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या नवीन परिपत्रकानुसार नगरपरिषद निवडणुकीसाठीचा प्रचार कालावधी एक दिवसांनी वाढविण्यात आला आहे. या सुधारित आदेशानंतर एरंडोल नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये सहभागी सर्वच उमेदवार तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजकीय पक्ष, आघाड्या तसेच अपक्ष उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून जोरदार प्रचार मोहीम राबविली होती. मात्र प्रचार कालावधी कमी असल्याने अनेकांना प्रभागांत पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. याचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने विशेष निर्णय घेत प्रचारासाठी अतिरिक्त एक दिवस मंजूर केला असून यामुळे प्रचाराची गती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

नवीन आदेशानुसार उमेदवारांना मतदारांशी अधिकाधिक संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. घरदारी भेटी, प्रचार सभा, पदयात्रा, जनसंपर्क मोहीम यांना आता आणखी चालना मिळणार असून अंतिम टप्प्यातील लढत अधिक चुरशीची होणार आहे.

प्रचार कालावधी वाढल्याची माहिती मिळताच सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. काही जणांनी याला ‘मतदारांपर्यंत पोहोचण्याची अतिरिक्त संधी’ असे संबोधले आहे.

एरंडोलमधील निवडणूक रंगतदार बनत असताना प्रचार कालावधी वाढविण्याचा निर्णय हा निवडणूक प्रक्रियेला अधिक सुगम व सुसूत्र करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button