जळगावमहाराष्ट्रराजकारण

एरंडोल नगर पालिकेत महिला राज, सहाही विषय समित्यांवर महिला सभापती.

प्रतिनिधी – एरंडोल येथील पालिकेच्या सहाही विषय समितीच्या सभापतीपदाची निवड बिनविरोध
करण्यात आली. सहाही समितीच्या सभापतीपदी महिलांना संधी देण्यात आली.पाच समितीचे सभापतीपद शिवसेनेला तर एका समितीचे सभापतीपद भाजपला देण्यात
आले.भाजप-शिवसेनेच्या पदाधिका-यांनी सर्व सभापतीपदावर महिलांना संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
    नगर पालिकेच्या विषय समितींच्या सभापती निवडीसाठी नगरसेवकांची सभा पालिका सभागृहात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,मुख्याधिकारी अमोल बागुल,नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न
झाली.पालिकेच्या सहाही विषय समितीचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड
करण्यात आली.पालिकेच्या विषय समितीचे सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे-
सार्वजनिक बांधकाम समिती-सभापती- कमल गोपाल पाटील,सदस्य-छाया आनंद दाभाडे,कल्पना मनोज पाटील,अमोल किशोर तंबोली ,डॉ.गितांजली नरेंद्र
ठाकूर,इमरानअली जाफरअली सय्यद.शिक्षण,क्रीडा व सांस्कृतिक कार्य
समिती.सभापती- सत्यभामाबाई माधव पाटील,सदस्य-प्रा.मनोज नथ्थू पाटील,कल्पना मनोज पाटील,जिजाबाई वसंत पाटील,रवींद्र संतोष
महाजन,इमरानअली जाफरअली सय्यद,स्वच्छता,वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य
समिती.सभापती-शारदा अतुल मराठे,सदस्य-मनोज नथ्थू पाटील,नय्यमखां दलशेरखां पठाण,कृष्णा प्रल्हाद ओतारी,भारती मनोज गुजर,शबानाबी नरोद्दिन सय्यद.पाणी
पुरवठा आणि जलनिस्सारण समिती-सभापती-मनकर्णाबाई चैत्राम चौधरी,सदस्य-मनोज
नथ्थू पाटील,अनिल केशव महाजन,आरती अतुल महाजन,नितेश कैलास चौधरी,नजमाबी
सईद कागजी.नियोजन व विकास समिती-सभापती-सुनीता रुपेश माळी (उपनगराध्यक्षा),सदस्य-मनोज नथ्थू पाटील,अनिल केशव महाजन,प्रशांत दिलीप महाजन,नितेश कैलास चौधरी,शबानाबी नुरुद्दीन सय्यद.महिला  व बालकल्याण
समिती-सभापती-पौर्णिमा महेश देवरे,सदस्य-कल्पना मनोज पाटील,छाया आनंद
दाभाडे,आरती अतुल महाजन,डॉ.गितांजली नरेंद्र ठाकूर,नजमाबी सईद
कागजी.स्थायी समिती-सभापती नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर,सदस्य-सुनिता
रुपेश माळी (उपनगराध्यक्ष),कमल गोपाल पाटील,सत्यभामाबाई माधव पाटील,शारदा
अतुल मराठे,मनकरनाबाई चैत्राम चौधरी,पौर्णिमा महेश देवरे.
    प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,मुख्याधिकारी अमोल बागुल,नगराध्यक्ष
डॉ.नरेंद्र ठाकूर तसेच पालिका कर्मचा-यांच्यावतीने सर्व सहाही विषय
समितीच्या सभापतींचा सत्कार केला.बैठकीस सर्व नगरसेवक व नगरसेविका
उपस्थित होते.दरम्यान आमदार अमोल पाटील यांनी सर्व समितीच्या सभापतीपदाची
संधी महिलांना दिल्याबद्दल विविध महिला संघटनांच्या पदाधिका-यांनी समाधान
व्यक्त केले.सहापैकी पाच समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या तर एका
सभापतीपदी भाजप सदस्याला संधी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button