आमदार अमोल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्राण येथे वह्या वाटप

प्रतिनिधी – उत्राण ता.एरंडोल येथे एरंडोल पारोळा विधानसभेचे आमदार अमोल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हापरिषद मराठी शाळा उत्राण गु. ह. येथील 200 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या असून आ. अमोल दादा पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघातील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना आवाहन केले होते की वाढदिवसाला येतांना कोणत्याही प्रकारचे फूल हार किंवा बुके तसेच इतर भेट वस्तू न आणता वह्या आणाव्यात जेणेकरून मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल म्हणून या आवाहनाला प्रतिसाद देत उत्राण येथील मा.ग्रामपंचायत सदस्य अमोल महाजन यांनी जिल्हा परिषद शाळेत आज वह्या वाटप केले असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती अनिल भाऊ महाजन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी सहकारी संघाचे संचालक पांडुरंग पाटील, तालुका उपप्रमुख राजेंद्र पाटील, माजी सरपंच विनोद महाजन, पिंटू वाघ, माजी उपसरपंच बापू महाजन, ग्रामपंचायत सदस्य हरेश पांडे, गुरुदास चौधरी, विकास सोसायटी संचालक विलास महाजन, ठाणे येथील पोलिस जगदीश पाटील उपस्थित होते, सदर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम प्रसंगी आमदार अमोल दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी आयोजक अमोल महाजन, हरेश पांडे यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन सोनवणे सर यांनी करून आभार मानले. वह्या मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील माळे सर, सचिन पाटील सर, सोनवणे सर, विनोद महाजन सर,महेंद्र चावरे सर,सोनवणे मँडम आणि काळे मँडम व सर्व शिक्षक आणि शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली




