एरंडोल येथील गोशाळे ला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित..

प्रतिनिधी एरंडोल – येथील गोमाता राजलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेला पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजनेअंतर्गत सन २०२५-२६ चा गोवंश- पक्षेत्र
विभागातून निवडी द्वारे परळी- वैजनाथ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील , सचिव तथा माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांना “श्रेष्ठ राजदूत” घोषित करून सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
गो शाळेत २५ शुद्ध देशी गीर गाई असून गेल्या आठ वर्षापासून सदर दांपत्याने गो-सेवेवा, संवर्धन, रक्षण व सेवा सुरू असून त्यातून पर्यावरण, कृषी, पंचगव्य, साबण, शुद्ध देशी तूप,दुध उत्पादन विक्री करून स्वदेशीचा संदेश देखील देत आहेत.
सदर सन्मानाबद्दल त्यांच्यावर सामाजिक, राजकीय, मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




