जळगावताज्या बातम्याधार्मिकमहाराष्ट्र

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त २० टन कचरा संकलन.

प्रतिनिधी – एरंडोल येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त सुमारे २० टन २५० किलो ओला व सुका कचरा संकलन करण्यात आला.
      तीर्थरूप डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्या सौजन्याने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त एरंडोल शहर व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकुर यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली.सकाळी ८ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत सुमारे ४२३ श्री सदस्यांनी २ टन ओला कचरा व १८.२५० टन सुका कचरा जवळपास २० टन कचरा संकलन केला.सदर कचरा १५ वाहनांमधून डंपिंग ग्राउंड वर पोहचविण्यात आला.सदर अभियानाची सुरुवात रा. ति.काबरे विद्यालयाच्या ग्राउंड वरून करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button