जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुने बस स्टँड परिसरात ९ वर्षीय बालकावर कुत्र्याचा हल्ला…

प्रतिनिधी अमळनेर:-शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून काल रात्री जुने बस स्टँड परिसरात एका ९ वर्षीय बालकावर कुत्र्याने भीषण हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
       अविनाश कैलास पांचाळ असे जखमी मुलाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याने अविनाशला जबर चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button