जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला दिनानिमित्त घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान; साडी वाटप करून गौरव

प्रतिनिधी एरंडोल –  आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कॉन्सिलर सौ. शिवाली पाटील–देशमुख यांच्या पुढाकाराने घरकाम करून कुटुंबांना हातभार लावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील या मेहनती महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना साडी वाटप करण्यात आले तसेच अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी महिलांचे समाज आणि कुटुंब घडविण्यातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी नामवंत डॉक्टर डॉ. अमरीन बोहरी यांनी महिलांना शारीरिक व मानसिक आरोग्याचा समतोल कसा राखावा, ताणतणावावर कशी मात करावी आणि स्वतःची तसेच कुटुंबाची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कॉन्सिलर सौ. शिवाली पाटील–देशमुख यांनी महिलांनी मानसिक आरोग्याची काळजी घेणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि आत्मविश्वास वाढवणे किती आवश्यक आहे यावर समुपदेशन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. मधुकर देशमुख यांनी केले. या कार्यक्रमात परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button