तालुका काँग्रेसतर्फे गॅस सिलिंडरच्या दर वाढ रद्द करण्याबाबत दिले निवेदन.

प्रतिनिधी – एरंडोल तालुका काँग्रेसतर्फे शासनाने गॅस सिलेंडर च्या दरात अचानक पणे केलेली दरवाढ रद्द करणे बाबत तहसीलदार एरंडोल यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात शासनाने अचानकपणे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात फार मोठी वाढ केली असून यामुळे गोर गरिब जनतेची लूट होत असून सर्व सामान्य जनतेला अच्छे दिन चे गाजर दाखवून आजवर किमान ५० वेळेस सरकारने घरगुती गॅस सिलिंडर चे दर वाढवले आहेत असे म्हटले असून काँग्रेसच्या काळात ४०० रुपये किमतीचा गॅस ९२० रुपये पर्यंत पोहचला असल्याचे म्हटले आहे.तसेच व्यावसायिक सिलेंडर देखील १५० रुपयांनी महाग झाला असून व्यवसायिक व महिला,सामान्य जनता यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे म्हणून आम्ही याबाबत आंदोलन करून निवेदन सादर करीत असल्याचे म्हटले आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुनील पाटील,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतन पाटील,महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा पाटील,एन.एस.यू.आय.तालुकाध्यक्ष मिलिंद पवार,योगेश सोनवणे,अण्णासाहेब सुर्वे,माजी शहराध्यक्ष संजय भदाणे,ॲड.हिम्मतराव पाटील, मुकुंदा केदार,सुरेश देशमुख, मदनलाल भावसार आदी उपस्थित होते.





