जळगावमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य प्रकरणी बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी एरंडोल :- धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यातील जनतेचे आराध्य दैवत असून त्यांच्या विषयी केलेले चुकीचे व इतिहासाची मोडतोड करणारे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर तालुका अध्यक्ष सुनील गोविंदा पाटील, विद्यार्थी आघाडीचे चेतन प्रभाकर पाटील, महिला कमिटीच्या अध्यक्ष श्रीमती प्रतिभा माधव पाटील, मदन दामोदर भावसार, कमरअल्ली सैयाद, शेख इमरान, शेख सांडू आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button