क्रीडाजळगावमहाराष्ट्र

“दिल्लीत गाजली एरंडोलची ‘समृद्धी’, जळगावचा झेंडा उंच!”

प्रतिनिधी एरंडोल – स्कूल गेम्स ऑफ इंडिया व क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६९ वी शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा १६ ते २१ एप्रिल दरम्यान दिल्ली येथे उत्साहात पार पडली. देशभरातील खेळाडूंमध्ये जळगाव जिल्ह्याने आपली दमदार उपस्थिती नोंदवली.

एरंडोल येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची कु. समृद्धी ज्ञानेश्वर पाटील हिने उत्कृष्ट खेळ करत रौप्य पदक पटकावले. तिच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.समृद्धीने क्रीडा शिक्षक श्री. मोहित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव केला. तिच्या मेहनतीला आणि जिद्दीला या यशाचे फळ मिळाले.

तिच्या यशाबद्दल एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी काबरे, चिटणीस राजीवजी मणियार, शालेय समिती अध्यक्ष श्री. नितीनजी राठी, सहसचिव श्री. धीरजजी काबरे, संचालक श्री. परेशजी बिर्ला, मुख्याध्यापक श्री. हॅरी जॉन, व्हॉइस प्रिन्सिपल सरिता पाटील,शिक्षकवर्ग, क्रीडा प्रशिक्षक तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तिचे अभिनंदन केले.समृद्धीच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button