जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

नसरापूर घटनेतील आरोपीला तत्काळ फाशी द्या.-सर्वपक्षीय पदाधिका-यांची मागणी.

प्रतिनिधी एरंडोल-पुणे जिल्ह्यातील नसरापूर भोर येथे तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणा-या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी
अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिका-यांनी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.अल्पवयीन बालिकेला न्यान न मिळाल्यास तीव्र
आंदोलन छेडण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे. नसरापूर येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा निषेधार्थ शहरातील सर्वपक्षीय पदाधिका-यांनी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना निवेदन दिले.नरसापूर येथील घटना माणुसकीला काळीमा
फासणारी असून सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी यावेळी पदाधिका-यांनी केली.आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी,आगामी
काळात अशा घटना होणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी,अल्पवयीन बालिका,महाविद्यालयीन विद्यार्थिनी,महिला यांचा सुरक्षेबाबत त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी महिला पदाधिका-यांनी केली.

यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी घटनेच्या निषेधार्थ घोषणा देवून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.धरणगाव चौफुली येथील उड्डाणपूल,म्हसावद नाका,रंगार खिडकी ते गांधीपुरा येथील अंजनी नदीवरील पुल,शाळा,महाविद्यालय परिसर यासह महिलांची वर्दळ असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पोलीस
बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.   यावेळी नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,किशोर निंबाळकर,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन,शिवसेनेचे जिल्हा समन्वयक जगदीश पाटील ,मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार,पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते , डॉ.प्रशांत पाटील,नगरसेवक नितेश चौधरी, अमोल जाधव,शिवसेना ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अतुल महाजन, नगर वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश ठाकूर, माजी नगरसेवक सुरेश खुरे,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,रश्मी
दंडवते,मुख्याध्यापिका क्षमा साळी,शोभना साळी,सरला विंचूरकर,वंदना कुलकर्णी, मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते, पवित्रा शुक्ला, नंदा शुक्ला,भारती साळुंखे, ॲड.आल्हाद काळे, ॲड.आकाश महाजन,नरेश डागा, करण पाटील , हेमंत कुलकर्णी,पद्माकर विंचूरकर,परेश पाठक,नीरज जगताप,शुभम मोराणकर,गणेश वाणी, दत्तात्रय भागवत, रमेश चौधरी,अभिजित जोशी,शिल्पा पाठक,विश्राम देशमुख,मोहन पाटील,महावीर भोई,कैलास महाजन यांचेसह विविध संघटनांचे व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थितांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button