जळगावमहाराष्ट्र

प्रशासकीय कारणास्तव ‘जनसमाधान बैठक’ रद्द

एरंडोल – उपविभागातील एरंडोल, पारोळा व धरणगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या, दैनंदिन प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी व तक्रारींचे स्थानिक स्तरावर जलद, समन्वयपूर्ण आणि कालबद्ध निवारण व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जळगाव यांच्या संकल्पनेतून उपविभाग स्तरावर ‘जन समाधान बैठक’ हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत दिनांक २५ जून २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता तहसील कार्यालय, पारोळा येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली जन समाधान बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत एरंडोल, पारोळा व धरणगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या, प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी व तक्रारींचे निवारण करण्यात येणार होते.
मात्र, प्रशासकीय कामानिमित्त सदरची जन समाधान बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, लोकशाहीदीना अतर्गत केलेले अर्ज, माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत सादर केलेले अर्ज, भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर केलेले अर्ज, न्यायालयीन अथवा न्यायप्रविष्ट प्रकरणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या व सेवा विषयक बाबी तसेच वैयक्तिक माहिती मिळविण्या संदर्भातील अर्ज या बैठकीच्या कार्यक्षेत्रा बाहेर ठेवण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button