पंकज पाटील यांचे विधी ( लाॅ ) परीक्षेत यश

प्रतिनिधी – पाचोरा परिसरातील युवक पंकज पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लॉ (Law) परीक्षेत यश संपादन करत आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पंकज पाटील यांनी आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, “समाजातील अन्याय, शोषण आणि वैचारिक गुलामगिरीविरुद्ध प्रभावीपणे लढण्यासाठी कायद्याचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने मी वकिली क्षेत्राची निवड केली आणि ही पदवी मिळवण्यासाठी प्रयत्न केले.”
त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत महत्त्वाची ठरली. समाजात न्याय, समानता आणि जनजागृतीसाठी पुढील काळात वकील म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे.
पंकज पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक , विधी क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.




