नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण; वटपौर्णिमेनिमित्त शिक्षणातून अध्यात्माकडे अनोखा संदेश…..

एरंडोल: के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान अध्यापनातील आधुनिक पद्धती, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर सुलभक यांनी अनमोल मार्गदर्शन केले .
याच प्रसंगी प्रशिक्षणाच्या मधल्या सुट्टीत महिला शिक्षिकांनी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करत त्यांनी वडाच्या झाडाची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
शिक्षक प्रशिक्षण आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. “शिक्षणातून अध्यात्माकडे” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा आदर्श उपक्रम व काम हीच पूजा यावर प्राधान्य देऊन या प्रशिक्षणातून समाजासमोर ठेवण्यात आली.
महिला शिक्षिकांनी प्रशिक्षणाला गैरहजर न राहता शंभर टक्के उपस्थितीत केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी श्री. आर.डी.महाजन साहेब व शापोआ.अधीक्षक श्री.जे.डी. पाटील साहेब .पंचायत समिती एरंडोल यांनी संपूर्ण कौतुक केले.





