छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त एरंडोल महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम

एरंडोल (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांनी शिक्षण प्रसार, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या समतेच्या व प्रगतिशील विचारांचे अनुकरण करून समाजात सामाजिक ऐक्य व न्याय प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब अमित पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. उमेश गवई, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. व्ही. एस. वाघ, बाल शिवाजी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता वाघ, श्री. हेमराज बडगुजर, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश येंडाईत यांनी केले. सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. मीना काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर विसपुते यांनी केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





