जळगावमहाराष्ट्र

स्वच्छ, सुंदर आणि निरोगी एरंडोलसाठी नगरपरिषदेचा पुढाकार. स्वच्छता कर्मचाऱ्यांची आढावा बैठक; PPE किटचे वितरण

एरंडोल, प्रतिनिधी : स्वच्छ, सुंदर आणि निरोगी एरंडोल घडविण्याच्या उद्देशाने एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीस नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी अमोल बागुल, उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी तसेच स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती शारदाताई अतुल मराठे उपस्थित होते. यावेळी शहरातील स्वच्छता मोहिम अधिक प्रभावीपणे राबविणे, नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करणे आणि दैनंदिन स्वच्छता कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मान्यवरांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षेला प्राधान्य देत त्यांना PPE (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किटचे वितरण करण्यात आले. या किटमुळे स्वच्छता कामकाज करताना कर्मचाऱ्यांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानेही त्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती दिली.
बैठकीस नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छता विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button