एरंडोल येथे महापुरुषांच्या पुतळा उभारणीबाबत सर्वपक्षीय बैठक; पुढील रूपरेषा ठरविण्याचा निर्णय..

प्रतिनिधी एरंडोल – येथील वि.का. सोसायटी कार्यालयात शहरातील महापुरुषांच्या पुतळा उभारणी संदर्भात सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहराच्या मध्यवर्ती भागातील महापुरुषांचे पुतळे अधिक भव्य व प्रेरणादायी स्वरूपात उभारण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा पूर्णाकृती स्वरूपात उभारावा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही पूर्णाकृती करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्वारूढ स्वरूपात उभारण्यात यावा, यावर सर्वानुमते सकारात्मक चर्चा झाली.
या मागण्यांसंदर्भात नगरपरिषद प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी ठोस रूपरेषा तयार करून संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीस अमित पाटील, विजय महाजन, रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, रवींद्र महाजन, जगदीश ठाकूर, डॉ. सुरेश पाटील, ईश्वर बिन्हाडे, रवींद्र पाटील, प्रसाद दंडवते, राजधर महाजन, प्रविण महाजन, सुरेश देशमुख, मदन भावसार आदी उपस्थित होते. प्रस्तावना विजय महाजन यांनी केली तर आभार प्रदर्शन ईश्वर बिहऱ्हाडे यांनी केले.





