सेवानिवृत्त एस टी कर्मचारी यांच्या कडून आगार प्रमुख दिलीप महाजन यांचा सत्कार….

प्रतिनिधी – एरंडोल आगारात नुकतेच हजर झालेले आगार प्रमुख दिलीप महाजन यांचा एरंडोल आगार सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे पुष्पगुच्छ शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला रा प म कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी विषयी आगार प्रमुख यांचे सोबत चर्चा करण्यात आली व त्यांना एरंडोल आगारातील भावी कारकीर्द साठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल आगारातील सेवानिवृत्त लेखाकार पी एम साळी साहेब होते व्यास पिठावर लेखाकार हर्षलता मोरे ,कार्यशाळा प्रमुख एस पी सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करतांना एरंडोल आगाराचे वाहक किशोर मोराणकर यांनी साहेबांच्या मागील. कार्यकाळाविषयी माहिती दिली सेवानिवृत्त रा प म कर्मचारी संघटनेचे बी एल ब्रह्मे जिभाऊ, संजय पल्लीवाळ, अशोक लोहार आणि किशोर पाटील यांनी आपले मनोगत व सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी विषयी मत व्यक्त केले. शेवटी सत्काराला उत्तर देताना आगार प्रमुख महाजन यांनी आपल्या एरंडोल आगारातल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व एरंडोल आगाराला प्रवासी उत्पन्न मध्ये व प्रवाशांना सुरक्षित व वेळेवर सेवा पुरवण्यामध्ये जळगाव विभागात एरंडोल आगाराचा प्रथम क्रमांक कसा येईल याविषयी उपस्थित चालक वाहक यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन वजा सूचना केल्या या सत्कार समारंभाला सेवानिवृत्त कर्मचारी एस ओ मोरे,,सुभाष पाटील ,एल वाय नेतकर एम जे शेख,प्रदीप पाटील ,एस एम दरशे,रवींद्र साळी, नवल चव्हाण, के के येवले,अरुण साळी, साकरलाल महाजन,,आर के पाटील ,रशीद पिंजारी,पी एन चौधरी,किशोर पाटील, ए बी शिंदे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रण पी एन चौधरी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.





