उद्धव ठाकरे शिवसेनेच्या एरंडोल तालुका बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

प्रतिनिधी एरंडोल : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची एरंडोल तालुका बैठक शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात पार पडली. नवनियुक्त तालुका संपर्कप्रमुख सुनीलजी सोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र अण्णा चौधरी, उपजिल्हाप्रमुख महाले सर, युवासेना उपजिल्हाप्रमुख गुलाबसिंग पाटील, युवासेना तालुकाप्रमुख शुभम पाटील, उपतालुकाप्रमुख विकास पाटील, समाधान महाजन, शिवदास पाटील, सुनील मराठे, रावसाहेब पाटील, धनराज अहिर, कासोदा अल्पसंख्याक शहरप्रमुख जलालदादा रवंजे, किशोरभाऊ चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी एरंडोल तालुक्यातील शिवसेनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तळई-उतराण गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी शिवदास पाटील, युवासेना तालुका संघटकपदी निलेश पाटील (जवखेडा), उतराण गणप्रमुखपदी उमेश पाटील (नागदुली), रिंगणगाव विभागप्रमुखपदी विठ्ठल बडगुजर, तर तळई-उतराण विभागप्रमुखपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करून त्यांना पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावात संघटना मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी सक्रियपणे काम करावे, असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला.
तालुक्यातील विविध गावांमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी, नवीन पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार तसेच आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची तयारी याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. बहुसंख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांमुळे बैठकीला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.





