जळगावमहाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनानिमित्त एरंडोल आगारात आगार प्रमुख दिलीप महाजन यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न

एरंडोल (प्रतिनिधी)  :- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एरंडोल आगारात आगार प्रमुख दिलीप महाजन यांचे शुभहस्ते बहुसंख्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आनंदात संपन्न झाले यावेळी वर्षभरात विनाअपघात सेवा देणाऱ्या अनेक चालक कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात रोख 1500 रुपये देऊन प्रशासनाच्या वतीने आगार प्रमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच एस टी कर्मचारी बांधवांच्या गुणवंत पाल्यांचा देखील सत्कार स्मृती चिन्ह,प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आगारातील उत्कृष्ठ उत्पन्न आणणारे वाहक,उत्कृष्ट कामगिरी करणारे यांत्रिक कर्मचारी ,पर्यवेक्षक कर्मचारी तसेच स्वछता महिला व पुरुष कर्मचारी यांच्या सह आगाराचे सर्व सुरक्षा कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी आगार प्रमुख यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना संस्कारासहित उच्च शिक्षित बनविण्यासाठी चे आवाहन करीत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी वाहक किशोर मोराणकर यांनी त्यांचा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल फुलपगारे यांनी मानले

यावेळी कार्यशाळा अधीक्षक एस पी सोनवणे,स्थानक प्रमुख मनोज तिवारी ,जितेंद्र सोनवणे,राहुल पाटील,आतिक शेख,ज्ञानेश्वर चौधरी,चेतन महाजन ,सचिन मोरे ,वाडीले,वानखेडे यांचे सह सर्वच कर्मचारी संघटना यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button