जळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथे सुवर्णकार समाज सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न

सामाजिक कार्यक्रमाचे व जन जागृतीचे सातत्य ठेवावे –
आमदार अमोल पाटील

एरंडोल – येथील सुवर्णकार समाजातर्फे आज श्री संत नरहरी महाराजांच्या 833 व्या जयंती चे औचित्य साधून सुवर्णकार सभागृहाचा लोकार्पण सोहळा मा.अमोलराव चिमणराव पाटील आमदार, एरंडोल, पारोळा यांचे शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी सर्व प्रथम श्री संत नरहरी महाराज यांचे प्रतिमा पूजन मा.मनोज पाटील गटनेते, शिवसेना एरंडोल व दीप प्रज्वलन मा.डॉ.नरेंद्र ठाकूर नगराध्यक्ष , न पा एरंडोल यांचे शुभ हस्ते करण्यात आले.या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सचिन विसपुते, अध्यक्ष, ग्रामीण उन्नती शिक्षण मंडळ यांनी केले.या सभागृहासाठी मा.अमोलराव चिमणराव पाटील यांनी आमदार निधीतून मोठी तरतूद करून दिली होती. अगदी कमी वेळात सर्व सभागृहाचे काम पूर्ण केल्याबद्दल सर्वांनी कार्यकारी मंडळाचे अभिनंदन केले.या कार्यक्रमात मा.अमोलराव चिमणराव पाटील आमदार यांचा सत्कार  जगदीश मोरे, अध्यक्ष, सुवर्णकार समाज,एरंडोल , मा. डॉ.नरेंद्र ठाकूर नगराध्यक्ष यांचा सत्कार  विकास पिंगळे , उपाध्यक्ष सुवर्णकार समाज, मा.मनोज पाटील गटनेते शिवसेना यांचा सत्कार  लोकेश बाविस्कर,खजिनदार, सुवर्णकार समाज, कृष्णा ओतारी, उपनगराध्यक्ष, न पा एरंडोल यांचा सत्कार  जगदीश लोटन मोरे, शालीग्राम गायकवाड माजी उपनगराध्यक्ष, न पा एरंडोल यांचा सत्कार  गणेश दाभाडे , अमोल बागुल मुख्याधिकारी, न पा एरंडोल यांचा सत्कार  विजय जाधव उद्योगपती एरंडोल तर  आनंद भाऊ दाभाडे यांचा सत्कार  सचिन वानखेडे  संजय जाधव,अध्यक्ष, जळगाव जिल्हा सुवर्णकार समाज यांचा सत्कार विवेक मोरे यांनी तर  प्रवीण महाजन पत्रकार यांचा सत्कार  अजय वाघ तसेच सौ कमलबाई गोपाल पाटील नगरसेविका एरंडोल यांचा सत्कार श्रीमती रत्ना दगडू देवरे माजी नगराध्यक्षा, एरंडोल, सौ भारती मनोज गुजर नगरसेविका,एरंडोल यांचा सत्कार श्रीमती रत्ना विजय मोरे सौ शारदा अतुल मराठे नगरसेविका,एरंडोल यांचा सत्कार सौ सुनीता अशोक मोरे यांचे शुभहस्ते करण्यात आला.तसेच या प्रसंगी एरंडोल येथील सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांचा सत्कार सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आला. शालिग्राम गायकवाड, मनोजभाऊ पाटील, डॉ .नरेंद्र ठाकूर नगराध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केलीत.अध्यक्षीय भाषणातून मा.अमोलराव पाटील यांनी सुवर्णकार समाज सभागृह लोकार्पण केल्याची घोषणा करून या सभागृहात विविध कार्यक्रमांचे सातत्य ठेवावे असे जाहीर केले.तसेच एरंडोल शहराच्या विकासासाठी मी माझे सर्व कार्यकर्ते सदैव काम करीत असून त्यातील हा छोटासा भाग आहे.यापुढे ही आम्ही विविध विकास कामे सर्व समाजासाठी करणार असून आपले सहकार्य व आशीर्वाद असू द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री विजय नामदेव भामरे तर आभार प्रदर्शन सौ अंजुषा सचिन विसपुते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button