महाबीजचा ५०वा वर्धापनदिन एरंडोल येथे साजरा

एरंडोल-राज्यशासनाचे बिज प्रक्रिया केंद्र म्हणजे महाबीजचा ५०वा वर्धापनदिन एरंडोल येथील केंद्रात साजरा झाला आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत विश्वनाथ पाटील हे होते
व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान अरविंद तडवी विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी अभिषेक जमधडे, तालुका कृषी अधिकारी शिवदे,विभागीय व्यवस्थापक दर्शन कान्हेड, जिल्हा व्यवस्थापक रविंद्र जोशी,वरिष्ठ केंद्र अभियंता आनंद खरात,तालुका निविष्ठा गुण नियंत्रण अधिकारी निखिल टोळकर, कृषी अधिकारी अनिल पाटील,पाळधी फ्रुट सेल सोसायटीचे चेअरमन एन. डी. पाटील इत्यादी उपस्थित होते.
रविंद्र जोशी यांनी प्रास्ताविक केले. कुरबान तडवी , दर्शन कान्हेड, अरविंद जमधडे,निंबा पाटील यांनी विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन राहुल भदाणे यांनी तर आभार अनिता ठाकरे यांनी मानले.





