फ्रुटसेल सहकारी संस्थेची ५७ वी वार्षीक सभा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी एरंडोल . कै आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील सहकारी संस्थेची ५७ वी वार्षीक सभा संस्थेचे मार्गदर्शक शालीग्राम श्रीपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे चेअरमन भगतसिंग शालीग्राम पाटील यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .
वार्षीक सभेचा वार्षीक अहवाल वाचन संस्थेचे संचालक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी केले . संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असून सतत अ वर्गात असल्याने सभासद बांधवांनी समाधान व्यक्त केले . संस्थेचे चेअरमन भगतसिंग पाटील यांनी सांगितले की , शेतकरी सभासद बांधवांसाठी खते , बी बियाणे , पेट्रोल , डिझेल मुबलक व मापक दरात उपलब्ध करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू . संस्थेचे संचालक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी प्रास्ताविक पर भाषणात सांगितले की , परिसरातील शेतकरी सभासद बांधवांना शेती विषयी शासकिय योजनाची माहिती उपलब्ध करून शासन दरबारी शेतकरी सभासदांसाठी पाठपुरावा करण्यास नेहमी तत्पर राहू . संस्थेचा विकास व प्रगती चांगली असून संस्था जिल्ह्यात नामंकित संस्था म्हणून परिचित आहे . स्व सहकारमहर्षी खंडेराव पाटील यांचे स्वप्नपुर्ती पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले . सभेत विविध विषयावर चर्चा होऊन सभा उत्साहात संपन्न झाली . सभेला तालुक्यातील व परिसरातील बहुसंख्य शेतकरी सभासद उपस्थित होते . शेवटी संस्थेचे मॅनेजर भिकन पाटील यांनी आभार मानले .




