श्रीराम प्रतिष्ठान तर्फे शिक्षकांचा सन्मान करून शिक्षक दिन साजरा…………….!

प्रतिनिधी एरंडोल – येथे जहांगीर पुरा भागातील श्रीराम प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जंगलू पाटील हे होते.यावेळी श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य दिनानाथ पाटील, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक बी.एस.चौधरी व प्रा.नितीन पाटील यांचा शाल श्रीफळ व गुलाबपष्प देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक प्रदीप फराटे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओम पाटील यांनी केले.आभारप्रदर्शन धीरज पाटील यांनी केले.याप्रसंगी शोभाताई पाटील,जयाताई पाटील,लिलाबाई पाटील, जयश्री पाटील, ज्योत्स्ना लोहार, कल्पना पाटील,वसंत फराटे, वसंतराव पाटील, गोकुळ महाजन, सदानंद पाटील, ज्ञानेश्वर पाटील,वसंत लोहार, अरविंद पाटील, जितेंद्र पाटील आदी नागरिक उपस्थित होते.
” शिक्षक हा केवळ अध्यापनाचे काम करीत नसून अध्यापनासोबत संस्कारक्षम पिढी घडवित असतो.तसेच शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती व आपल्या गौरवशाली परंपरा रूजविण्याचे काम करीत असतो.” असे प्रतिपादन प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी यावेळी केले.





