जळगावमहाराष्ट्र

एरंडोल शिवारात महाबीज वाणांचे पीक प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी एरंडोल : तालुक्यातील टोळी खुर्द येथे  महाबीज यांच्या वतीने गहू व हरभरा वाणांचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. शरद किसन पाटील यांच्या शेतात गहू वाण फुले सात्विक (NIAW 3170) तर आकाश रामचंद्र पाटील यांच्या शेतावर हरभरा वाण फुले विक्रम या पिकांची पाहणी करण्यात आली.
कार्यक्रमास विभागीय व्यवस्थापक डी. डी. कन्हेड, जिल्हा व्यवस्थापक आर. सी. जोशी, मंडळ कृषी अधिकारी आय. बी. पवार, कृषी सहायक धनंजय सावंत, नगरसेवक गोपाल शामू पाटील, नितीन सदाशिव पाटील, प्रगतशील शेतकरी तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील (कासोदा) यांच्यासह एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कृषी क्षेत्र अधिकारी अनिता ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्हा व्यवस्थापक आर. सी. जोशी यांनी दर्जेदार बियाणे निर्मिती प्रक्रिया समजावून सांगत शेतकऱ्यांनी महाबीजचे प्रमाणित बियाणे खरेदी करण्याचे आवाहन केले. विभागीय व्यवस्थापक डी. डी. कन्हेड यांनी महाबीजची जैविक खते, बुरशीनाशके तसेच केळी व पपई रोपांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी आय. बी. पवार यांनी शासनाच्या विविध कृषी योजना तसेच AI MahaVistar App संदर्भात माहिती देत शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पन्नक्षम करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप कृषी क्षेत्र अधिकारी एस. पी. देवरे यांनी आभार प्रदर्शनाने केला.
या वेळी गहू व हरभरा पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. महाबीजच्या विविध वाणांबाबत तसेच जैविक खतांबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button