क्राईमजळगावमहाराष्ट्र

कासोदा पोलिसांची अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई; ३ जनावरे व मालवाहू वाहन असा एकूण २,९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी एरंडोल – कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर कासोदा पोलिसांनी कारवाई करून ३ जनावरे व अशोक लेलँड कंपनीचे मालवाहू वाहन असा एकूण २,९०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक १४/०९/२०२६ रोजी सकाळी सुमारे ०९.३० वाजेच्या सुमारास कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील फरकांडे गावाजवळील सहकारी दूध डेअरीच्या जवळ, सार्वजनिक ठिकाणी, ता. एरंडोल, जि. जळगाव येथे गावकऱ्यांच्या मदतीने सदरची कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे एका मालवाहू चारचाकी वाहनामधून गुरांची विनापरवाना व जनावरांना वेदना होतील अशा पद्धतीने वाहतूक करीत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ३ लहान-मोठ्या गायी आढळून आल्या. सदर जनावरांना दोरीने बांधून वाहनामध्ये वाहतूक करण्यात येत होती.

जप्त मुद्देमाल

  1. अंदाजे ७ वर्षे वयाची गाय
  2. अंदाजे ६ वर्षे वयाची गाय
  3. अंदाजे ५ वर्षे वयाची गाय
    तिन्ही गायीची एकूण किंमत 40,000/-
  4. अशोक लेलँड कंपनीचे मालवाहू चारचाकी वाहन क्र. MH-19-CY3850 ,किंमत अंदाजे 2,50,000/-

अशा प्रकारे एकूण 2,90,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी

या प्रकरणात खालील व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून तीनही आरोपी अटक करण्यात आले आहेत

  1. चंद्रकांत बापू पवार, वय ४० वर्षे, रा. म्हसवे, ता. पारोळा, जि. जळगाव(वाहतूक करणारा व गाडी मालक )
  2. सुरेश भावडू सोनावणे , रा. म्हसवे, ता. पारोळा, जि. जळगाव (गायी विकणारा )
  3. राहुल गोरख वाघ, रा. खडके, ता. एरंडोल, जि. जळगाव (विकत घेणारा )

सदर प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. १४४/२०२६ प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(क), (घ) , (ड ) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5(अ ) (ब ) व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईतील पोलीस अधिकारी व अंमलदार

सदर कारवाई सपोनि श्रीकांत अंकुश पाटील, कासोदा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पो ना नरेंद्र पाटील, पो शि योगेश पाटील, लहू हाटकर , कुणाल देवरे

तपास अधिकारी पोना /२१७३ नरेंद्र महादू पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button