आरोग्यदूत पुरस्काराने जितेंद्र पाटील सन्मानित.

प्रतिनिधी :- टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. पै. तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जगातील सर्वात मोठे युवक नेतृत्व शिबिर फलटण येथे भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शिवभक्त पै. अनिकेतभाऊ घुले यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप व शिवजल ग्रुप फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या कार्यक्रमात आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “आरोग्यदूत पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सातत्यपूर्ण लोकसेवा व समाजहितासाठी केलेल्या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
श्री पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात तसेच सामाजिक उपक्रमांमधून समाजसेवा करत असून, त्यांच्या कार्यामुळे असंख्य नागरिकांना मदत मिळाली आहे. या सन्मानामुळे तरुण पिढीसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे मत कार्यक्रमातील मान्यवरांनी व्यक्त केले.
या गौरवाबद्दल आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन तसेच टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करत श्री जितेंद्र पाटील यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




