एरंडोल तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवारतर्फे महाशिवरात्री निमित्त भव्य भंडारा..

प्रतिनिधी एरंडोल : हिंदू धर्मातील पवित्र सण महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जय बाबाजी भक्त परिवारतर्फे साबुदाणा खिचडीचा भव्य भंडारा उत्साहात आयोजित करण्यात आला. यंदाचे हे आयोजन सलग नवव्या वर्षी पार पडले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.
भंडाऱ्यादरम्यान सुमारे ११ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. उपवास करणाऱ्या भाविकांसाठी खास साबुदाणा खिचडीची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.
या भंडाऱ्याचे आयोजन जय बाबाजी भक्त परिवाराचे कार्यकर्ते भरत महाजन (तालुका सेवक), काशिनाथ महाजन, पिंटू महाजन, सुभाष महाजन, संजय पाटील आदींनी केले. सर्व सदस्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जात असून समाजात धार्मिक आणि सामाजिक ऐक्य वाढविण्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.




