जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोलात दंगा नियंत्रण चा सराव; शहरात पोलिसांचा रूट मार्च, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना

एरंडोल : आगामी सण-उत्सव व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने एरंडोल पोलीस स्टेशनतर्फे मंगळवार (दि. ७ जुलै) रोजी शहरातील रंगारी पूल–चुनाभट्टी परिसरात दंगा नियंत्रण सराव आयोजित करण्यात आला. दुपारी ३.५९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या सरावाचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर उपविभाग), पोलीस निरीक्षक सुनील पवार एरंडोल यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या सरावादरम्यान एरंडोल नगरपरिषदेचे अग्निशामक वाहन, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पथक व ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच अमळनेर उपविभागातील पारोळा पोलीस स्टेशनचे एक अधिकारी व पाच अंमलदार सहभागी झाले होते. धरणगाव पोलीस स्टेशनचे एक अधिकारी व चार अंमलदार यांना राखीव ठेवण्यात आले होते.
एरंडोल पोलीस स्टेशनचे तीन अधिकारी व २२ अंमलदार यांनी या सरावात सहभाग घेतला. सरावा नंतर रंगारी पूल, चुनाभट्टी, भगवा चौक, नथ्थु बापू दर्गा आणि मरीमाता चौक या मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढत नागरिकांना शांतता, सुव्यवस्था व सुरक्षिततेचा संदेश दिला.

दंगा नियंत्रणचा सराव शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे या सरावातून अधोर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button