जिजाऊंच्या कर्तृत्वातूनच शिवबा सारखा राजा घडला…मा. नगरसेवक जगदीश ठाकूर

एरंडोल प्रतिनिधी – अखंड हिंदुस्थानाचं प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वातूनच छत्रपती शिवरायांसारखा शूरवीर राजा घडला व शिवस्वराज्य उभे राहिले. मुघलांची जुल्मी राजवट नेस्तनाबूत करण्यासाठीच राजमाता जिजाऊ सारखी एक खंबीर शक्ती शिवरायांच्या पाठीशी होती असे प्रतिपादन नगर वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश भाऊ ठाकूर यांनी केले. ते वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाळधी स.न.झवर विद्यालयाचे चेअरमन सुनील झवर, चिटणीस रवींद्र लाळगे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सुनील झवर, जगदीश ठाकुर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुनील झवर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे असून त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे. खरं तर अशा महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वातूनच एक आदर्श राष्ट्र घडत असते. म्हणूनच अशा थोर महापुरुषांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कवी प्रवीण महाजन तर आभार संचालक परेश बिर्ला यांनी मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक गुरूप्रसाद पाटील, डॉ.प्रेमराज पळशीकर, सहचिटणीस संतोष वंजारी, रवींद्र सोनार, दिनकर महाजन, संजय अग्निहोत्री, श्री मोरे व ग्रंथपाल देवेंद्र वंजारी आदी उपस्थित होते.




