महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल आगारप्रमुख पदी दिलीप महाजन…..

एरंडोल – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल आगारप्रमुख पदी यावल येथून बदली होऊन आलेले दिलीप महाजन नुकतेच रुजू झाले तत्कालीन आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांचे कडून त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला यावेळी उपस्थित कार्यालयीन कर्मचारी वर्गाने त्यांचे पुष्पगुच्छ स्वागत केले आपल्या पदावर रुजू झाल्यानंतर लगेच त्यांनी आगारात उपस्थित सर्व चालक,वाहक ,यांत्रिक व कार्यालयीन कर्मचारी यांचे सोबत बैठक घेतली यावेळी त्यांनी उपस्थित सर्व कर्मचारी बंधू व भगिनी यांना आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून आपल्या आगाराचे उत्पन्न कसे वाढेल,प्रवाशी बांधवाना उत्तम प्रकारच्या सोयी सुविधा कशा पद्धतीने पुरवता येतील तसेच आगार व बस स्थानक परिसर स्वच्छ व सुंदर कसा राखता येईल याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले खास करून चालक व वाहक यांनी कोणत्याही दबावात काम न करता आपल्या कडून कोणत्याही प्रकारची अक्षम्य चूक होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करीत कामचुकार व व्यसनाधीन कर्मचाऱ्याला वेळप्रसंगी दंड करण्याचे देखील निर्देश त्यांनी दिलेत यावल येथील त्यांच्या तीन वर्षांच्या चांगल्या प्रशासकीय कामाचा अनुभव व त्यांनी तिथे उत्पन्न वाढी साठी केलेले सर्वोतोपरी प्रयत्न तसेच प्रशासन व कर्मचारी यांच्यात कायमस्वरूपी टिकवलेला समन्वय व कर्मचाऱ्यांचा जिंकलेला विश्वास नक्कीच एरंडोल आगाराच्या प्रगतीसाठी व प्रवाशांच्या सोयी साठी उपयुक्त ठरेल अशी भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली तालुक्यातील तळई गावाचे रहिवाशी असल्याने व साहजीकच परिसरातील पूर्ण माहिती असल्याने पंचक्रोशीतील असंख्य विद्यार्थी व प्रवाशी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विभागनियंत्रक प्रज्ञेश बोरसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त केली





