स्व गणना प्रक्रियेत शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकुर यांनी केली प्रथम स्व गणना.

प्रतिनिधी – एरंडोल नगरपरिषद हद्दीत जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. 1 मे 2027 पासून स्व-गणनेच्या प्रक्रियेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. याच अनुषंगाने एरंडोल नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी स्वतःच्या कुटुंबाची स्व-गणना प्रथम नागरिकाचे कर्तव्य बजावत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल,एस.आर. ठाकूर, शरद राजपूत,हितेश जोगी आणि वैभव पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी जनगणना प्रक्रियेत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबाची स्व-गणना करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, जनजागृतीसाठी एरंडोल नगरपरिषदेमार्फत शहरात घंटागाडीवरून दवंडी देण्यात येत असून विविध ठिकाणी बॅनर लावून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करून स्व-गणना प्रक्रिया यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





