जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

*पातरखेडा येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आश्रमशाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात……..!*

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील पातरखेडा येथे आश्रमशाळेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आश्रमशाळेच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन २८ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडले.यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार अमोल पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, नगरसेवक नरेंद्र पाटील जळगांव, तहसीलदार गोपाळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आदिवासी महिला पालक मेळावा घेण्यात आला.
       ढोल वाद्यांच्या गजरात शाळेतील आदिवासी मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पारंपरिक नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.ना.मंत्री महोदयांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्कुल बॅग देऊन गौरव करण्यात आला.
      प्रास्ताविक संस्थाध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.डी.माळी यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन संस्थेच्या सचिव करिश्मा राहुल पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button