जळगावधार्मिकमहाराष्ट्र
ब्रह्माकुमारीज आत्म अनुभूति भवन येथे मातृदिन उत्साहात साजरा

एरंडोल : – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या अंतर्गत ब्रह्माकुमारी आत्म अनुभूति भवन, एरंडोल सेंटर येथे आज मातृदिन मोठ्या उत्साहात आणि प्रेमळ वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात केंद्रावरील सर्व ज्येष्ठ दीदींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ब्रह्मा कुमारी पुष्पा दीदी, सविता दीदी तसेच इतर दीदींचा भावपूर्ण सत्कार पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.
उपस्थित बंधू भगिनींनी मातृशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात मातृत्वाचे महत्त्व, संस्कार आणि अध्यात्मिक जीवनातील मातृशक्तीची भूमिका याविषयी मनोगते व्यक्त करण्यात आली. वातावरण आनंदमय व प्रेरणादायी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.





