जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

एरंडोल नगरपरिषद पोटनिवडणूक : प्रभाग ९ (ब) मधून डॉ. देवयानी पाटील बिनविरोध

एरंडोल : एरंडोल नगरपरिषद पोटनिवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ (ब) मधील महिला राखीव जागेसाठी भाजपाच्या डॉ. देवयानी लिलाधर पाटील यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांचा एकमेव अर्ज निवडणूक रिंगणात कायम राहिला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

नगरपालिका सभागृहात दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अमोल बागुल तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी अमोल बन उपस्थित होते. चार उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानंतर डॉ. देवयानी पाटील या एकमेव उमेदवार उरल्याने प्रभाग क्रमांक ९ (ब) बिनविरोध घोषित करण्यात आला.

दरम्यान, माजी नगरसेविका जिजाबाई वसंत पाटील यांच्या निधनामुळे सदर जागा रिक्त झाली होती. विशेष म्हणजे डॉ. देवयानी पाटील या जिजाबाई पाटील यांच्या नात आहेत. त्यामुळे या निवडीकडे भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहिले जात असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक पातळीवर पाटील परिवाराचा सामाजिक व राजकीय संपर्क मोठा असल्याने बिनविरोध निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. प्रभागातील प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button