जळगावमहाराष्ट्र

के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

प्रतिनिधी एरंडोल : येथील के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव करत निरोगी जीवनाचा संदेश दिला. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न व शांत राहते तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक. दिनानाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नीलप्रभा मॅडम, रुपाली पाटील, अर्चना बनसोडे, माधुरी सोनवणे, प्रीती बियाणी, निशिता पेंढारकर, भारती भावसार, नेहा देशमुख, गणेश पाटील, भगवान मराठे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी “नियमित योग करूया, निरोगी जीवन जगूया” असा संकल्प करून योग दिनाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button