जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

 महात्मा फुले हायस्कूलमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप;

एरंडोल प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने महात्मा फुले हायस्कूल येथे स्व. कुशल भाऊ तिवारी फाउंडेशन व धनश्री इन्फास्ट्रक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सामाजिक बांधिलकी जपत स्व. कुशल भाऊ तिवारी फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीही विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करून त्यांना नियमित अभ्यास, शिस्तबद्ध शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित करण्यात आले.
या उपक्रमासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल भाऊ तिवारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला राहुल भाऊ तिवारी, शाळेचे मुख्याध्यापक विनोद जाधव, दीपक महाजन, कर्णवीर परदेशी, सुधीर चौधरी तसेच चेतन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील माळी यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिनेश चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
शालेय साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत असून अशा सामाजिक उपक्रमांचे समाजात स्वागत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button