सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे तालुकास्तरीय नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार

एरंडोल – येथे सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे नवनियुक्त तहसीलदार गोपाळ पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, एरंडोल बस आगार प्रमुख दिलीप महाजन, पोस्टमास्तर विवेक देशपांडे या बदली होऊन रूजू झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण देवराम माळी हे होते.यावेळी जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष अरूण माळी यांनी यावेळी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.प्रासताविक उपाध्यक्ष जाधवराव जगताप यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले.याप्रसंगी निवृत्त नायब तहसीलदार सुरेश पारखे,पी.जी.चौधरी, विश्वनाथ पाटील,प्रा.शिवाजीराव अहिरराव, गणेश पाटील, भगवान महाजन, सुरेश देशमुख,वसंत ठाकूर, डॉ.अशोक तोतले,जगन महाजन, वसंतराव पाटील, नामदेवराव पाटील,निंबा कुंभार, रविंद्र लाळगे,आय.जी.माळी, गुलाबराव पवार, वामनराव माळी, संतोष वंजारी, राजेंद्र पवार, भास्कर महाजन आदी उपस्थित होते.




