क्राईमजळगावमहाराष्ट्र

अमळनेरात पिशवीतून रोख रक्कम लंपास

अमळनेर (प्रतिनिधी)
शहरातील बँक ऑफ बडोदा बँकेच्या परिसरातून एका इसमाच्या पिशवीतून ३१ हजार २०० रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ रोजी उघडकीस आली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहरातील बोरसे गल्ली भागात राहणारे काशिनाथ उत्तम महाजन हे आपल्या पत्नीसह दुपारी १२.३० वाजता बँक ऑफ बडोदा येथे ३१ हजार २०० रुपयांची फिक्स डिपॉझिट करण्यासाठी गेले. सोबत आणलेल्या नायलॉन च्या पिशवीमध्ये त्यांची रोख रक्कम होती,दुपारी २ वाजेपर्यंत ते बँकेत होते.डिपॉझिट स्लिप भरल्यानंतर बँकेत पैसे भरण्यासाठी पिशवीत हात टाकला असता त्यांना पिशवी खालून कापलेली दिसली व पैसे मिळून आले नाही.
पिशवी कापून कुणीतरी पैसे लांबविल्याचे समजल्यानंतर त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात तक्रार दाखल केली. पुढील तपास पो कॉ विनोद संदानशिव करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button