कासोदा येथे बीएलओंचा सत्कार; शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी ग्रामपंचायत सदस्यांचा उपक्रम

एरंडोल प्रतिनिधी : – शिक्षक दिनाचे औचित्य साधून कासोदा येथे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमास नागरिक, शिक्षक, बीएलओ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक तथा जेष्ठ पत्रकार डॉ,नुरुद्दीन मुल्लाजी होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “बीएलओ हे लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. मतदार यादी अद्ययावत ठेवण्यापासून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यापर्यंत बीएलओ जबाबदारीने काम करतात. त्यांचे कार्य हे केवळ शासकीय कर्तव्य नसून लोकशाही मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण काम आहे.”
“शिक्षक दिनाच्या निमित्ताने बीएलओंचा सन्मान करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे. अशा सत्कारामुळे संबंधितांना आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते,” असेही नुरुद्दीन मुल्लाजी यांनी सांगितले.
कार्यक्रमात बीएलओंचा पुष्पगुच्छ व सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बीएलओंच्या कार्याचे कौतुक केले. प्रस्ताविक मा, ग्रामपंचायत सदस्य अरशद अली सूत्रसंचालन शिक्षक शाकीर खान यांनी केले
शिक्षक गौतम जाकीर खान हाजी नूरुद्दीन यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला मुश्रीफ पठाण, शेख शाकीर सर, अजीज अब्दुल बारी सर,अश्फाक अली, जमशेर पठाण, नवाब शेख ,मुख्तार पैलवान, युसुफ खान ,कबीर खान ,कबीर शेख ,रेहान अली मेहमूद शेख यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते





